आदर्श प्रतिष्ठानचा १८ वा वर्धापन दिन व डॉ.संतोष कामेरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Share with others

ठाणे (दि. १४)प्रतिनिधी : ठाणे येथील प्रसिद्ध उद्योजक, बिझनेस कोच, लाईफ कोच, सुप्रसिद्ध वक्ते व लेखक डॉ.संतोष कामेरकर यांचा वाढदिवस व आदर्श प्रतिष्ठानचा १८ वा वर्धापन दिन काल दि.१३ मार्च रोजी डॉ.काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. तसेच या निमित्ताने समाजातील विविध कर्तुत्ववान व कार्यशील व्यक्तीमत्वांचा भव्य दिमाखदार व सांस्कृतिक कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाकरीता वैश्य ग्लोबल बिजनेस ग्रुप, सॅटर्डे क्लब, वैश्यवाणी समाज, ट्रेनर्स असोसिएशन आणि आदर्श प्रतिष्ठानचे सभासद व बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया: अनेक लोक खूप लांबून लांबून आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाला आले होते. माझ्या वाढदिवसा निमित्ताने हजारो लोकांनी नेहमीप्रमाणेच शुभेच्छांचा वर्षाव केला. तुमच्या सर्वांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. असेच सहकार्य, आशीर्वाद, माया, प्रेम आपण कायम आमच्यावरती व्यक्त कराल हिच अपेक्षा! या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर आमची जबाबदारी नक्कीच वाढली आहे. परमेश्वर आपणा सर्वांना सुख, समाधान, समृद्धी, संपत्ती व उत्तम आरोग्य देवो हीच प्रार्थना! सर्वांचे लाख लाख धन्यवाद!
-डॉ. संतोष कामेरकर, संस्थापक-आदर्श प्रतिष्ठान

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेते,लेखक,प्राध्यापक अशोक चिटणीस सर, सॅटर्डे क्लबचे मॅनेजिंग ट्रस्टी अशोकराव दुगाडे सर, यशस्वी उद्योजक दीपक मेजारी जी, बेडेकर मॅनेजमेंट कॉलेज चे संचालक नितीन जोशी, वैश्य सहकारी बँकेचे संचालक प्रदीप गांगण, एडवोकेट विलास गांगण, कोकणस्थ वैश्य समाजाचे भाई शेट्ये, जागृती गांगण, मेघना थरवळ, रचना व अमित बागवे, दीपक शिंदे, आरती बनसोडे, नितीन बोरसे, काही नगरसेवक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आदी, मान्यवर या उपस्थित होते.

याप्रसंगी उद्योगभूषण या पुरस्काराने संजय भाट, मनोज आंग्रे, संतोष दलाल, गणेश महाडेश्वर आणि अनेक सामाजिक संस्थांना सन्मानित करण्यात आले. सभागृह भरून अनेक माणसं शेवटपर्यंत उभी होती. रेखा चव्हाण, वैष्णवी, साक्षी सावंत यांच्या समूहाने बहारदार नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

आदर्श प्रतिष्ठानच्या १८ वा वर्धापन दिन व सांस्कृतिक कार्यक्रमास मान्यवर,प्रेक्षक यांनी खच्च भरलेले डॉ.काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे सभागृह…

रवींद्र खानविलकर, राजेंद्र गोसावी, वैशाली बुरडे, नेहा मठकर, श्रद्धा कामेरकर,बंधू नारकर, बाळकृष्ण म्हसकर, शिरीष दोशी हे आमचे पदाधिकारी तसेच हितचिंतक सभासद रमेश कल्लोळकर, रेखा चव्हाण, साक्षी सावंत, सुवर्णा रणसुभे, दर्शन पावसकर, अभिजीत चौधरी, सुरज ठकेकर, राकेश लेंढे, संजीव शिरसाठ, धनश्री सुकी, संतोष कोकाटे, किशोर शिरसाट आदी सर्वांच्या अथक परिश्रमामुळे आपण हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

Related posts

Leave a Comment