‘अंबाजोगाईतील संविधान भान आणि सामाजिक जाण’ उपक्रमाची ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद

अंबाजोगाई (दि. १० सप्टें.) प्रतिनिधी: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अंबाजोगाई येथील प्रा. सर नागेश जोंधळे यांच्या “आई” संस्थेने आयोजित केलेल्या अभिनव “संविधानभान” उपक्रमाची ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद झाली आहे. या उपक्रमाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देणारी संस्था म्हणून ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ ने सृजनशील कार्याच्या विविध क्षेत्रांतील उपक्रमांची नोंद घेतली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या विशेष प्रसंगी आयोजित केलेल्या या उपक्रमात अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालय आणि सिताफळ संशोधन केंद्राच्या परिसरात संविधानातील ३९५ कलमांचे शीर्षक असलेले ३९५ फलक प्रदर्शित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणि मान्यवरांनी हातात फलक…

Read More