नाशिक, २ ऑक्टोबर २०२४ – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने कचरा डेपो येथील महिलांना विशेष सन्मान देत त्यांचे श्रम आणि योगदान अधोरेखित करण्यासाठी मार्शल संघटित- असंघटित कामगार युनियन व नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांना सुरक्षा साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमात त्या महिलांना शारीरिक सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले जेणेकरून त्या त्यांच्या कामकाजामध्ये सुरक्षितपणे कार्य करू शकतील. कचरा डेपोमध्ये काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या रोजच्या कष्टांमध्ये अनेक प्रकारच्या आरोग्य व सुरक्षेच्या समस्या येतात. यासाठी त्यांना योग्य सुरक्षा साहित्य देण्याचे उद्दिष्ट ठेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात…
Read MoreCategory: नाशिक
नाशिक येथे तिसरे राज्यस्तरीय बौद्ध धर्म संमेलन संपन्न
“धम्मसंस्कृतीचे पुनरुज्जीवन केल्यामुळे डॉ. आंबेडकरांनी समाजावर अनंत उपकार केले” – मंगेश दहिवले नाशिक, २९ सप्टेंबर – भारतामध्ये बुद्ध शासन काळात बौद्ध धम्माची संस्कृती तब्बल बाराशे वर्ष टिकून राहिली, ज्यामध्ये मानवाच्या कल्याणाचा विचार केंद्रस्थानी होता. या धम्मसंस्कृतीमुळेच भारताचा जागतिक स्तरावर गौरव होत आहे. या संस्कृतीचे पुनरुज्जीवन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील लोकांवर अनंत उपकार केले आहेत, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय धम्म अभ्यासक मंगेश दहिवले (नागपूर) यांनी केले. ते नाशिक येथील कालिदास कलामंदिर येथे धम्मकाया मिशन आयोजित राज्यस्तरीय तिसऱ्या बौद्ध धर्म संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या संमेलनाचा प्रारंभ तथागत भगवान…
Read Moreनाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित मार्शल कामगार युनियनचे काम बंद आंदोलन
नाशिक (दि.०८ ऑगस्ट ) प्रतिनिधी : नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. (कचरा डेपो) कंपनीने ८ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित मार्शल कामगार युनियनने कामगारांच्या समस्यांचा समावेश करून त्यांच्या निराकरणासाठी विनंती केली होती. तथापि, कंपनीच्या मालकांनी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असून, कोणतीही सकारात्मक कृती केली नाही. या स्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित मार्शल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष, श्री. प्रशांत खरात यांच्या नेतृत्वात ८-८-२४ गुरूवारपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. युनियनने ठामपणे स्पष्ट केले आहे की, कामगारांच्या मागण्यांचे समाधान होईपर्यंत काम सुरू केले जाणार नाही. या आंदोलनाचे नेतृत्व श्री. प्रशांत…
Read Moreभारतीय हितरक्षक सभेकडून मानसिक आरोग्यावर शनिवारी (3 ऑगस्ट ) मोफत कार्यशाळा
नाशिक : भारतीय हितरक्षक सभा, भारत या सामाजिक संघटनेमार्फत ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महिलांचे मानसिक आरोग्य याविषयावर मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.३) दुपारी १२:३० ते ३ या वेळेत ही कार्यशाळा होणार असून सहभागासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.कार्यशाळा कविवर्य नारायण टिळक वाचनालय क्लासरूम, होलीक्रास चर्च, त्रंबकनाका सिग्नल जवळ, नाशिक येथे होणार असून ‘माझे मानसिक आरोग्य’ यावर मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील समुपदेशक तथा मानसिक आरोग्य प्रशिक्षक मुक्ता मोहिते मार्गदर्शन करणार आहेत. १८ ते ३० वर्ष वयोगटातील फक्त ३० मुलींसाठी ही कार्यशाळा होणार असून त्यात मानसिक आरोग्य म्हणजे काय, मानसिक…
Read Moreराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मार्शल संघटीत असंघटीत कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली बेमुदत साखळी उपोषण सुरू
नाशिक, २३ जुलै २०२४: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मार्शल संघटीत असंघटीत कामगार युनियनने नाशिक एमआयडीसी मधील भ्रष्ट अधिकारी व इटऑन A-11 अंबड कंपनी मधील झालेल्या बेकायदेशीर प्लॉटिंग घोटाळ्याच्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. या घोटाळ्याची एस. आय. टी. चौकशी होण्याच्या मागणीसाठी उपोषण कर्ते प्रशांत खरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिनांक २३ जुलै २०२४ पासून हे उपोषण सुरु केले आहे. कामगार युनियनच्या नेतृत्वाने एमआयडीसीमधील भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर प्लॉटिंग घोटाळ्याचा निषेध करत सरकारकडे एस. आय. टी. चौकशीची मागणी केली आहे. उपोषण कर्त्यांनी सरकारला आवाहन केले आहे की या घोटाळ्याची संपूर्ण चौकशी करून…
Read Moreसुविचार मंच आयोजित चौथ्या सुविचार गौरव पुरस्काराचे वितरण कालिदास येथे मोठ्या उत्साहात वितरण
राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती सुविचार मंच आयोजित चौथ्या सुविचार गौरव पुरस्कार सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मान्यवरांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर (जीवन गौरव), अभिनेते गौरव चोपडा (कला), अभिनेत्री सौ.अक्षया देवधर व अभिनेते हार्दिक जोशी (विशेष पुरस्कार), श्री. रामचंद्रबापू पाटील (सामाजिक), डॉ. भाऊसाहेब मोरे (वैद्यकीय),…
Read Moreस्माईल फाउंडेशनच्या माध्यमातून संत कबीर नगर येथे मोफत आरोग्य व औषधोपचार शिबीर संपन्न
बॉश इंडिया फाउंडेशन व स्माईल फाऊंडेशन यांचा स्माईल ऑन व्हील संयुक्त उपक्रम नाशिक (२६ डिसेंबर) : नाशिक येथील बॉश इंडिया फाउंडेशनच्या व स्माईल फाऊंडेशन यांच्या एकत्रित प्रयत्नातून सुरु असलेल्या ‘स्माईल ऑन व्हील’ या उपक्रमाअंतर्गत शहरातील संत कबीर नगर, सातपूर येथे मोफत आरोग्य शिबीर व मार्गदर्शन संपन्न झाले. या आरोग्य शिबिरात सुमारे ३५१ जणांनी लाभ घेतला. आरोग्य तपासणी शिबीराची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या शिबिराकरीता डॉ. अमृता पाटील ( स्त्रीरोग तज्ञ), डॉ. विपुल काळे (अस्थिरोग तज्ञ) डॉ. अनुगंध आहेर (त्वचारोग तज्ञ ), श्री.सुनील सालियान…
Read More26 डिसेंबर 2023 रोजी ‘वीर बाल दिना’निमित्त होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी
नवी दिल्ली (२६ डिसेंबर) : नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं येत्या 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता ‘वीर बाल दिना’निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते दिल्लीतल्या तरुणांच्या संचलनाला हिरवा झेंडा दाखवतील. या दिनाचे औचित्य साधून नागरिकांना विशेषत: लहान मुलांना, साहिबजादा यांच्या अतुलनीय शौर्य गाथांची माहिती करून देणे आणि त्यांच्यात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं सरकारच्या वतीनं देशभरात नागरिकांचा सहभाग असलेल्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जाणार आहे. देशभरातल्या शाळा आणि बालसंगोपन संस्थांमध्ये डिजीटल स्क्रीनच्या माध्यमातून साहिबजाद्यांच्या जीवनगाथा आणि बलिदानाची माहिती देणारं प्रदर्शनही आयोजित केलं जाणार आहे. या निमित्तानं देशभरात ‘वीर बाल दिना’ विषयी एक…
Read Moreलासलगावं येथे प्रसिद्ध गणिततज्ञ गौरव भंडारी यांची कार्यशाळा संपन्न ; 300 हून अधिक विद्यार्थ्यांना लाभले मार्गदर्शन
लासलगाव, ता. १९ : येथील नूतन विद्याप्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गणित कार्यशाळा झाली. संस्थेच्या मॅनेजिंग बोर्डाचे सदस्य हसमुख पटेल अध्यक्षस्थानी होते. गौरव भंडारी व्याख्याते होते. मॅनेजिंग बोर्डाचे सदस्य सचिन मालपाणी, प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा. भूषण हिरे, डॉ. सोमनाथ आरोटे, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक उज्वल शेलार, किशोर गोसावी, सुनील गायकर, इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सत्तार शेख आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळेत गणन पूर्वतयारी, संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, मापन, आकृतिबंध या सर्व गणित संबोधावर प्रात्यक्षिकआणि गणित शिक्षण मनोरंजक कसे होईल, याचे मार्गदर्शन झाले. बँकिंग…
Read Moreसावरगाव-गंगाव्हरे, नाशिक येथील सामाजिक व्यक्तिमत्व स्वप्नील गोतरणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.. विविध समाज माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव..!
नाशिक (दि.०८ डिसेंबर): सावरगाव- गंगाव्हरे नाशिक येथील सामजिक व्यक्तिमत्व स्वप्नील गोतरणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वप्नील गोतरणे हे नाशिक तालुका सेवा दल कॉंग्रेस, नाशिक चे पदाधिकारी आहेत. स्वप्नील गोतरणे यांच्यावर यावेळी त्यांच्या अनेक हितचिंतक, नातलग-आप्तेष्ठ व मित्रपरिवार यांनी विविध समाज माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. स्वप्नील गोतरणे यांनी अल्पकाळातच आपली एक नवीन ओळख समाजात निर्माण केली आहे. ते मविप्र विधी महाविद्यालयात विधीशाखेतून पदवी संपादन करत आहेत. आपल्या सामाजिक, राजकीय भरीव कार्यातून ते सध्या नाशिक तालुका सेवादल काँग्रेस, नाशिकचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अनेक हितचिंतक व मित्रपरिवार यांनी…
Read More