सावरगाव-गंगाव्हरे, नाशिक येथील सामाजिक व्यक्तिमत्व स्वप्नील गोतरणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.. विविध समाज माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव..!

Share with others

नाशिक (दि.०८ डिसेंबर): सावरगाव- गंगाव्हरे नाशिक येथील सामजिक व्यक्तिमत्व स्वप्नील गोतरणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वप्नील गोतरणे हे नाशिक तालुका सेवा दल कॉंग्रेस, नाशिक चे पदाधिकारी आहेत. स्वप्नील गोतरणे यांच्यावर यावेळी त्यांच्या अनेक हितचिंतक, नातलग-आप्तेष्ठ व मित्रपरिवार यांनी विविध समाज माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला.

स्वप्नील गोतरणे यांनी अल्पकाळातच आपली एक नवीन ओळख समाजात निर्माण केली आहे. ते मविप्र विधी महाविद्यालयात विधीशाखेतून पदवी संपादन करत आहेत. आपल्या सामाजिक, राजकीय भरीव कार्यातून ते सध्या नाशिक तालुका सेवादल काँग्रेस, नाशिकचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अनेक हितचिंतक व मित्रपरिवार यांनी एकत्र येऊन त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी आपला स्नेह व्यक्त करत त्यांच्याप्रती आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद व्यक्त केला आहे.

स्वप्निल गोतरणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मविप्र विधी महाविद्यालयाचा कट्टर जिगरी ग्रुप मित्रपरिवार

यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये सरपंच -लक्ष्मण बेंडकुळे, नामदेव गोतरणे, संजू महाराज, विजय दोंदे, महादेव डहाळे, विश्वास वनसे, संजय गोतरणे, अमित मोरे, प्रकाश गोतरणे, संजू महाराज, संदीप मोरे, दिलीप गुंबाडे, संभाजी धोंगडे, समाधान गुंबाडे, गुलाब वाघ, अशोक बबन गोतरणे, मनोहर धोंगडे, किरण वनसे ,अनिल दिवे, विशाल गुंबाडे, हर्षद गुंबाडे, शिवम गोतरणे, ऋषिकेश गोतरणे, सतीश गोतरणे, नाना मोरे, तानाजी धोंगडे, सुनील मोरे, श्रावण गुंबाडे, भास्कर गोतरणे, शंकर गोतरणे, पवन पारधी, सावरगाव- गंगाव्हरे ग्रामस्थ मंडळी, सरपंच ,उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य, कट्टर जिगरी ग्रुप, एक मेरा साथ तेरा ग्रुप, स्वप्निल गोतरणे मित्र मंडळ आदी उपस्थित होते.

Related posts

Leave a Comment