महात्मा गांधी जयंतीनिमित्त कचरा डेपो येथील महिलांना सुरक्षा साहित्य वाटप – मार्शल संघटित- असंघटित कामगार युनियन आणि नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. यांचा पुढाकार

नाशिक, २ ऑक्टोबर २०२४ – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने कचरा डेपो येथील महिलांना विशेष सन्मान देत त्यांचे श्रम आणि योगदान अधोरेखित करण्यासाठी मार्शल संघटित- असंघटित कामगार युनियन व नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांना सुरक्षा साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमात त्या महिलांना शारीरिक सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले जेणेकरून त्या त्यांच्या कामकाजामध्ये सुरक्षितपणे कार्य करू शकतील. कचरा डेपोमध्ये काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या रोजच्या कष्टांमध्ये अनेक प्रकारच्या आरोग्य व सुरक्षेच्या समस्या येतात. यासाठी त्यांना योग्य सुरक्षा साहित्य देण्याचे उद्दिष्ट ठेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात…

Read More