नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित मार्शल कामगार युनियनचे काम बंद आंदोलन

Share with others

नाशिक (दि.०८ ऑगस्ट ) प्रतिनिधी : नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. (कचरा डेपो) कंपनीने ८ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित मार्शल कामगार युनियनने कामगारांच्या समस्यांचा समावेश करून त्यांच्या निराकरणासाठी विनंती केली होती. तथापि, कंपनीच्या मालकांनी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असून, कोणतीही सकारात्मक कृती केली नाही.

या स्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित मार्शल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष, श्री. प्रशांत खरात यांच्या नेतृत्वात ८-८-२४ गुरूवारपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. युनियनने ठामपणे स्पष्ट केले आहे की, कामगारांच्या मागण्यांचे समाधान होईपर्यंत काम सुरू केले जाणार नाही.

या आंदोलनाचे नेतृत्व श्री. प्रशांत खरात करत असून, त्यांच्याबरोबर युनियनच्या शाखा अध्यक्ष प्रवीण विरेकर, ऋषिकेश बोराडे, नितीन तेलुरे, दीपक आंग्रे, प्रवीण पवार, आकाश बोराडे, सोमनाथ बगड, गणेश ढगे, राकेश पगारे, निलेश करडईकर, लता ठोकळ, कमल साळवे, सुनीता अवचार, यनुबाई शेवरे आणि इतर कामगार सहभागी झाले आहेत.

आंदोलनामुळे संपूर्ण कचरा डेपोमध्ये काम बंद करण्यात आले आहे. कामगारांच्या मागण्यांचे समाधान होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे, अशी माहिती युनियनने दिली आहे.

कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात कामगारांनी एकजुटीने या आंदोलनात भाग घेतल्यामुळे, स्थानिक प्रशासनाने आणि कंपनीच्या प्रतिनिधींनी या समस्येवर त्वरित लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे.

Related posts

Leave a Comment