नाशिक : भारतीय हितरक्षक सभा, भारत या सामाजिक संघटनेमार्फत ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महिलांचे मानसिक आरोग्य याविषयावर मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.३) दुपारी १२:३० ते ३ या वेळेत ही कार्यशाळा होणार असून सहभागासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.कार्यशाळा कविवर्य नारायण टिळक वाचनालय क्लासरूम, होलीक्रास चर्च, त्रंबकनाका सिग्नल जवळ, नाशिक येथे होणार असून ‘माझे मानसिक आरोग्य’ यावर मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील समुपदेशक तथा मानसिक आरोग्य प्रशिक्षक मुक्ता मोहिते मार्गदर्शन करणार आहेत. १८ ते ३० वर्ष वयोगटातील फक्त ३० मुलींसाठी ही कार्यशाळा होणार असून त्यात मानसिक आरोग्य म्हणजे काय, मानसिक…
Read More