अंबाजोगाई (बीड) दि.१६ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत अंबाजोगाई येथील प्रतिष्ठित शैक्षणिक आणि सेवाभावी संस्था ‘आई’ने ‘संविधान भान’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमाचा उद्देश भारतीय संविधानाचे महत्त्व आणि लोकशाही मूल्यांची शिकवण तरुण पिढीमध्ये रुजवणे हा होता. कार्यक्रमाद्वारे संविधानाच्या मुलभूत तत्त्वांवर लक्ष केंद्रित करून सामाजिक जागरूकतेला बळकटी देण्यात आली. कृषी महाविद्यालय अंबाजोगाई आणि सिताफळ संशोधन केंद्राच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्या मैदानात करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या ३९५ कलमांचे फलक हातात धरून एक मानवी साखळी तयार केली. ही साखळी भव्य वर्तुळाच्या स्वरूपात मांडून संविधानाचा संदेश…
Read More