सोलापूर (दि.२४ ) : योग्य वातावरणात वाढवले की कोणतीही भाषा शिकता येते याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सोलापूरचा ३ वर्षाचा अलेक बनसोडे. ३ वर्षाचा अलेक फक्त फ्लूइंट इंग्लिशच बोलत नाही तर तो अमेरिकन इंग्लिश त्याच स्टाईलने बोलतो. अवघड इंग्लिश एक्सप्रेशन बोलत एखादी गोष्ट समजावून सांगतो. त्याच्या या बोलण्याचे सर्वच ठिकाणी कौतुक होत असते.
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व अक्षया बनसोडे हे दोघे २०२३ मध्ये एका बिजनेस प्रोग्रामसाठी 3 महिने अमेरिका व कॅनडात गेले होते. यांचा मुलगा असलेला अलेकनेही २०२३ मध्ये ३ महिने कॅनडा व अमेरिकेत घालवले परंतु त्यावेळी त्याला काहीही बोलता येत नव्हते. कॅनडात त्याच्या वयाच्या व मोठ्या वयाच्या अनेक मुलांशी खेळताना अलेक काही बोलायचं नाही. पण जेव्हा ऑगस्ट-२०२३ मध्ये हे सर्वजण भारतात आले त्यावेळी मात्र अलेक अमेरिकन इंग्लिश बोलू लागला. पुढील काही महिन्यात त्याचा भाऊ अक्षनसोबत भाषेत प्राविण्य मिळवले.
“अलेकला २-३ भाषांमध्ये पारंगत करण्याचा विचार आहे. सध्या आम्ही मराठीवर फोकस केले आहे. अभ्यास कधीही करता येतो परंतु विविध भाषेमुळे भविष्यात अनेक दरवाजे उघडले जातात”
-आनंद व अक्षया (अलेकचे आईवडील)
“अलेकसोबत गप्पा मारल्यामुळे व सतत संभाषण केल्यामुळे आता माझी इंग्रजी भाषा सुधारली आहे. पूर्वी अमेरीकन इंग्लिश कळत नसायचे पण आता ३ वर्षाच्या अलेकमुळे मला ती ऍसेन्ट समजत आहे”
-अमित कांबळे (उद्योजक व आनंद बनसोडे यांचा मित्र)
अलेक मराठी बोलतानाही अमेरिकन ऍक्सेन्टनेच बोलतो. सोशल मीडियावर अलेकच्या बोलण्याचे मेहमीच कौतुक होते.