नाशिकचे सिद्धार्थ सपकाळे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Share with others

नाशिक प्राइम नेटवर्क (दि.२४): क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले – राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराचे वितरण आज रंगसरडा सभागृह, वांद्रे, मुंबई येथे करण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील टिटोली जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सिद्धार्थ सोमा सपकाळे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील 1 प्राथमिक शिक्षक, आदिवासी भागातील 2 प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक गटातील 1 गटातील 2 शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.

पुरस्काराचे स्वरूप: स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, रु. 1 लाख रुपये धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभातलोढा, शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, संचालक कृष्णकुमार पाटील ऑनलाइन उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी राज्यातील प्रमोद परदेशी, अनिल बागुल, कैलास बोधरे, सचिन गायकवाड आदी शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार निर्मला गावित, नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. टिटोलीच्या सरपंच लता गायकवाड, खादी ग्रामोद्योगचे व्हॉइस चेअरमन अनिल भोपे, शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सिद्धार्थ सपकाळे यांचे अभिनंदन केले आहे.

Related posts

Leave a Comment