शिक्षण सर्वांसाठी समृद्ध महाराष्ट्रासाठी: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत परिसंवाद

Share with others

नाशिक प्राईम न्यूज : राहुल बनसोडे (दि. २५ जुलै ): महाराष्ट्र शासनाने ८ जुलै रोजी राज्यातील मुलींसाठी पारित केलेल्या मोफत शिक्षण योजनेच्या अनुषंगाने आज, २५ जुलै रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील ६०००० महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. या संवादात अनेक विद्यार्थ्यांना थेट प्रश्न विचारता आल्याने हा संवाद सुसंवाद ठरला.

संवाद कार्यक्रमात काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

राज्यातील मुलींना शिक्षण मिळावे, त्यांची शिक्षणात पीछेहाट होऊ नये म्हणून १००% शिक्षण शुल्क माफ करणारी योजना ८ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करण्यात आली. या योजनेअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींना शिक्षण शुल्कात (Tution fee) १००% माफी, परीक्षा शुल्कात (Exam fee) १००% माफी देण्यात आली आहे. इतर शुल्क (जसे की, जिमखाना शुल्क, सांस्कृतिक शुल्क) मर्यादित स्वरूपात घेण्यास महाविद्यालयास परवानगी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विद्यापीठाने मान्यता दिलेल्या एकूण ६४२ प्रमाणित अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

ज्या विद्यार्थिनी आधीच अन्य कोणत्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत असतील (जसे की SC/ST कॅटेगरी शिष्यवृत्ती) त्यांना ही योजना लागू होणार नाही. एका वेळेस एकच योजनेचा लाभ घेता येईल.

दि. १ ऑगस्ट पासून शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर या योजनेसाठी अर्ज करता येईल. ही योजना सध्या दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी लागू नाही, त्याबाबत पुढे पाहू असे चंद्रकांत पाटील म्हणाले. महाविद्यालयांनी या योजनेचा लाभ सर्वापर्यंत पोहचवण्याकरिता विशेष कक्ष सुरू करावे, त्यासंबंधी सूचना, नोटीस काढून ती नोटीस बोर्डावर लावावी अशा सूचना शासनाकडून महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.

असा करा अर्ज

१. आपला महाविद्यालयातील प्रवेश निश्चित करा.
२. दि. १ ऑगस्ट पासून शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर या योजनेसाठी अर्ज करा.

आवश्यक कागदपत्रे:

१. या योजनेचा लाभाकरिता निकष हा जातीचा नसून आर्थिक उत्पन्नाचा आहे, त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा ८ लाख आहे. २. महाराष्ट्र राज्यातील अधिवासाचा (Domicile) दाखला आवश्यक आहे. ३. महाविद्यालयातील प्रवेश पावती इतकेच मर्यादित स्वरूपाचे कागदपत्रे आवश्यक असून ते फावल्या वेळेत (जेव्हा भरपूर वेळ असतो) काढून ठेवण्याचे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी केले.

Related posts

Leave a Comment