360 एक्सप्लोररमार्फत छत्रपती संभाजीनगरात आंतरराष्ट्रीय 7 समिट व साहसी मोहीम कार्यशाळा

Share with others

छत्रपती संभाजीनगर दि.27): सह्याद्रीमधील अनुभवी ट्रेकर्सना मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय साहसी मोहिमा आयोजित करणारी भारतातील आघाडीच्या 360 एक्सप्लोरर ग्रुपने “युरेका साहसी मोहीम मार्गदर्शन” विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. 360 एक्सप्लोररचे संस्थापक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक, लेखक एव्हरेस्टवीर श्री.आनंद बनसोडे व मराठवाड्याच्या एव्हरेस्टवीर प्रो. मनीषा वाघमारे यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत छत्रपती संभाजीनगर, जालना येथील ट्रेकर्स सहभागी झालेले होते. या कार्यक्रमात श्री. आनंद बनसोडे यांनी ट्रेकिंग या साहसी प्रकारातुन स्वतःचे व समाजाचे ट्रान्सफॉमेशन व सकारात्मक बदल घडवण्यासाठी मार्गदर्शन केले.

याशिवाय खालील बाबींबद्दल विशेष ट्रेनिंग देण्यात आली.1) आंतरराष्ट्रीय ट्रेक कसे निवडावे.2)मोहीम कशी आखणी कशी करावी.3) आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी sponsorship कशी मिळवावी. तसेच CSR मधुन कसे प्रायोजक निवडावे.4) ट्रेकिंग करीता आहार व व्यायाम कसे असावे व सकारात्मक कसे असावे. छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध एव्हरेस्टवीर प्रो.मनिषा वाघमारे यांनीही शहरातील महिला ट्रेकरनेही या प्रकारच्या साहसी मोहीमेत भाग घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर मधिल ट्रेकर श्री. दत्ता रामदास सरोदे तसेच विनोद विभुते यांनी नुकतेच १५ आँगस्ट २०२३ ला दक्षिण आफ्रिकेतील सर्वात ऊंच किलीमंजारो समिट यशस्वीरीत्या पुर्ण केल्या बाबत विशेष सत्कार करण्यात आला. आनंद बनसोडे व मनिषा वाघमारे यांचा ही ट्रेकिंग बाबतीत असलेल्या अमुल्य योगदानाबद्दल विशेष सत्कार स्पोर्ट्स क्लायमिंग अँड माऊंटनेरींग असोसिएशन छ.संभाजी नगर तसेच दुर्गप्रेमी मित्र मंडळ याचे कडून करण्यात आला.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी येथील समन्वय श्री. दत्ता सरोदे आणि किशोर नावकर यांच्यासह स्पोर्ट्स क्लायबिंग व माउंटेनिअरिंग असोसिएशनचे राहुल अहिरे, किशोर नावकर, रत्नदीप देशपांडे, विशाल काकडे, सुरज सुलाने, डॉ.प्रशांत काळे, शोएब पठाण, प्रवीण सावंत, गौरव ठाकूर, योगेश मुंगीकर, अक्षय कांबळे, मनीष पहाडिया या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूपच मेहनत घेतली. या प्रसंगी श्री. जहागिरदार,श्री. जमधडे.श्रीमती रुपाली कचरे,डॉ. संगिता देशपांडे यांची ऊपस्थिती होती. 360 एक्सप्लोरर मार्फत आंतरराष्ट्रीय मोहिमेत सहभागी होण्यासाठी व योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी 7770000205 | 7770000206 यावर संपर्क करावा असे आवाहन आनंद बनसोडे यांच्या मार्फत केले गेले.

Related posts

Leave a Comment