भारतीय हितरक्षक सभेकडून मानसिक आरोग्यावर शनिवारी (3 ऑगस्ट ) मोफत कार्यशाळा

Share with others

नाशिक : भारतीय हितरक्षक सभा, भारत या सामाजिक संघटनेमार्फत ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महिलांचे मानसिक आरोग्य याविषयावर मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.३) दुपारी १२:३० ते ३ या वेळेत ही कार्यशाळा होणार असून सहभागासाठी नाव नोंदणी आवश्‍यक आहे.कार्यशाळा कविवर्य नारायण टिळक वाचनालय क्लासरूम, होलीक्रास चर्च, त्रंबकनाका सिग्नल जवळ, नाशिक येथे होणार असून ‘माझे मानसिक आरोग्य’ यावर मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील समुपदेशक तथा मानसिक आरोग्य प्रशिक्षक मुक्ता मोहिते मार्गदर्शन करणार आहेत.

१८ ते ३० वर्ष वयोगटातील फक्त ३० मुलींसाठी ही कार्यशाळा होणार असून त्यात मानसिक आरोग्य म्हणजे काय, मानसिक आरोग्य संबंधित गरज कशा ओळखाव्यात, मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी सोप्या पद्धती कोणत्या, ताणतणाव व्यवस्थापन कसे करावे, मानसिक आरोग्य संबंधातील समस्यांसाठी मदत कशी घ्यावी याची माहिती मिळणार आहे. नाव नोंदणीसाठी किरण मोहिते -९५६१८८३५४९ व कृष्णा शिंदे ९२८४२९२१७६ यांच्याशी संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts

Leave a Comment