नाशिक, २३ जुलै २०२४: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मार्शल संघटीत असंघटीत कामगार युनियनने नाशिक एमआयडीसी मधील भ्रष्ट अधिकारी व इटऑन A-11 अंबड कंपनी मधील झालेल्या बेकायदेशीर प्लॉटिंग घोटाळ्याच्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. या घोटाळ्याची एस. आय. टी. चौकशी होण्याच्या मागणीसाठी उपोषण कर्ते प्रशांत खरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिनांक २३ जुलै २०२४ पासून हे उपोषण सुरु केले आहे.
कामगार युनियनच्या नेतृत्वाने एमआयडीसीमधील भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर प्लॉटिंग घोटाळ्याचा निषेध करत सरकारकडे एस. आय. टी. चौकशीची मागणी केली आहे. उपोषण कर्त्यांनी सरकारला आवाहन केले आहे की या घोटाळ्याची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
उपोषणाच्या माध्यमातून युनियनने नाशिक एमआयडीसीतील कामगार आणि सामान्य नागरिकांना या घोटाळ्याबद्दल जागरूक करत त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे. उपोषणामुळे कामगारांच्या हिताच्या समस्यांची सरकारने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
उपोषण कर्ते प्रशांत खरात यांनी सांगितले की, जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत त्यांचे उपोषण सुरूच राहणार आहे.