भारतीय गिर्यारोहकांची ऐतिहासिक कामगिरी: 360 एक्सप्लोररच्या नेतृत्वात माउंट एलब्रूस शिखर सर

Share with others

नाशिक प्राईम न्यूज नेटवर्क (दि.१८ ऑगस्ट ): रशियातील युद्धजन्य परिस्थिती असतानाही, 360 एक्सप्लोरर ग्रुपच्या नेतृत्वाखालील भारतीय गिर्यारोहकांनी माउंट एलब्रूस शिखरावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या विविध व्यक्तींनी अनोख्या कामगिरीच्या जोरावर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.

मोहिमेचे नेतृत्व करणारे आनंद बनसोडे हे माउंट एलब्रूस शिखर तीन वेळा सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन ठरले आहेत. यासोबतच 12 वर्षीय प्रीती सिंगने हे शिखर सर करून मध्यप्रदेशातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहक म्हणून नाव कमावले आहे.

उद्योजक विनोद विभूते यांनी डायबेटीस असूनही शिखरावर पोहोचत “डायबेटीस कॅन क्लाइम्ब माउंटन्स” हा संदेश दिला. तसेच, डॉ. प्रशांत काळे यांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाखात शिखर सर केले.

तीन तासांत शिखर सर करणारा सुरज सुलाने सर्वात जलद महाराष्ट्रीयन ठरला आहे, तर रुपाली कचरे यांनी 15 ऑगस्ट रोजी शिखराच्या पायथ्यावर महाराष्ट्रगीत गायले. दत्ता सरोदे यांनी माउंट किलीमांजारो आणि माउंट एलब्रूस सर करत पहिले महानगरपालिका कर्मचारी म्हणून आपला ठसा उमटवला आहे.

क्रीडा शिक्षक किशोर नावकर यांनी “गर्ल्स कॅन डू एनीथिंग” या संदेशासह शिखरावर यशस्वी चढाई केली, तर अजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती शिखरावर पोहोचवली आहे. याशिवाय, चेतन परमार सर्वात लहान युवक आणि मैसूरचे प्रीत अपय्या सर्वात ज्येष्ठ गिर्यारोहक ठरले आहेत.

360 एक्सप्लोरर ग्रुपच्या या मोहिमेने भारतीय गिर्यारोहकांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठा उंचावली असून, देशाच्या साहसी भावनेचे प्रतीक म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे.

Related posts

Leave a Comment