360 एक्सप्लोररमार्फत छत्रपती संभाजीनगरात आंतरराष्ट्रीय 7 समिट व साहसी मोहीम कार्यशाळा

छत्रपती संभाजीनगर दि.27): सह्याद्रीमधील अनुभवी ट्रेकर्सना मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय साहसी मोहिमा आयोजित करणारी भारतातील आघाडीच्या 360 एक्सप्लोरर ग्रुपने “युरेका साहसी मोहीम मार्गदर्शन” विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. 360 एक्सप्लोररचे संस्थापक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक, लेखक एव्हरेस्टवीर श्री.आनंद बनसोडे व मराठवाड्याच्या एव्हरेस्टवीर प्रो. मनीषा वाघमारे यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत छत्रपती संभाजीनगर, जालना येथील ट्रेकर्स सहभागी झालेले होते. या कार्यक्रमात श्री. आनंद बनसोडे यांनी ट्रेकिंग या साहसी प्रकारातुन स्वतःचे व समाजाचे ट्रान्सफॉमेशन व सकारात्मक बदल घडवण्यासाठी मार्गदर्शन केले. याशिवाय खालील बाबींबद्दल विशेष ट्रेनिंग देण्यात आली.1) आंतरराष्ट्रीय ट्रेक कसे निवडावे.2)मोहीम कशी…

Read More