छत्रपती संभाजी नगर (दि.08 जाने.) : जगातील बुद्धांच्या एकतेचे प्रतीक बनलेल्या बौद्ध धम्म ध्वजाच्या गौरव दिनानिमित्त मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट ते बौद्ध लेणी अश्या धम्मध्वज गौरव रॅली चे आयोजन करण्यात आले होते. रॅली मधील शंभर फूट लांब धम्मध्वजाने यावेळी लक्ष वेधून घेतले अत्यंत उत्साहात बौद्ध लेणी येथे धम्म रॅली चा समारोप करण्यात आला. विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ जल्लोषात ‘जग में बुद्ध का नाम है, यही भारत ही शान है, धम्मध्वज चिरायू होवो, बुद्ध धम्म की एक ही पुकार, बाबासाहेब का…
Read More